व्हॉट्सॲपचं नवं फिचर माहिती होताच तुमचीही उडेल झोप, चक्क मॅसेज…

एकमेकांना संदेश पाठविण्यासाठी वापरले जाणारे लोकप्रिय ऍप म्हणजे  व्हॉट्सअॅप होय. ते जास्तीत जास्त युजर फ्रेन्डली होण्यासाठी त्यात भन्नाट फिचर आणली जात आहेत त्यामुळे युजर्स खुश आहेत. मात्र व्हॉट्सअॅपने आणलेले नवे फिचर पाहून तुम्हीही चक्रावून जाल. कारण व्हॉट्सअॅपमधील नव्या फिचरच्या मदतीने आता व्हॉट्सअॅपवरील मॅसेज एडिट होऊ शकणार आहेत. यामुळे तुम्हाला सेंड केलेले मॅसेज आता एडिट करणं शक्य होणार आहे. 

व्हॉट्सअॅप मॅसेज चक्क एडिट करता येणार त्यामुळे वापरकर्ते खुष झाले आहेत पण याचा जेवढा उपयोग होईल तेवढाच दुरूपयोगही होण्याची शक्यता आहे. मात्र हे युजरच्या वापर करण्यावर अवलंबून असेल असे कंपनीचे म्हणणे आहे.  व्हॉट्सअॅपच्या लेटेस्ट फिचरला WABetaInfo मध्ये स्पॉट केलं गेलं असून मॅसेज एडिट करण्याचे फिचर Whatsapp v2.22.20.12 मध्ये आहे. वेबसाईटला याचा एक स्क्रिनशॉटही शेअर केला गेलाय. ज्यामध्ये तुम्हाला त्याची डिटेल्स बघायला मिळेल. हे फिचर सध्या बीटा युजर्ससाठी उपलब्ध नाही. मात्र कंपनीने अधिकृत वेबसाईटवर शेअर केलेल्या स्क्रिनशॉटनंतर कंपनी येणाऱ्या फिचरवर काम करत असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. अँड्रॉईड युजर्सला लवकरच हे फिचर उपलब्ध होणार आहे.अशा प्रकारची अनेक फिचर सध्या टेस्ट केली जात आहेत. 

मॅसेज सेंड केल्यावर तो किती वेळात एडिट करता येईल याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. व्हॉट्सअॅपच्या आणखी काही फिचर्सवर काम केलं जात असल्याचंही कळतंय.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.