शिवसेना फुटीचा फायदा कोणाला? काय म्हणतो सर्व्हे?

आज जर लोकसभेची निवडणुक झाली तर काय होईल? या संदर्भात इंडिया टीव्हीने एक सर्वे केला आहे. या सर्वेच्या माध्यमातून शिवसेनेचा पडलेल्या फुटीचा फायदा नेमका कोणाला? आणि किती फायदा होईल? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामध्ये भाजपला ४८ %, राष्ट्रवादी काँग्रेसला २१ %, काँग्रेसला १७ % आणि मनसेला १४ % फायदा होईल असा अंदाज लावण्यात आला आहे. तसेच लोकसभा निवडणूक झाली तर शिंदे गटाला ११ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या सर्वेमध्ये मनसेला १४ % फायदा होईल ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेला पाठिंबा दिला होता. भाजप विरोधातील लाव रे तो व्हिडीओ प्रकार आपल्याला चांगलाच लक्षात असेल. पण तरीही आज लोकसभेची निवडणूक झाली तर मनसेला १४ टक्के फायदा होईल असा अंदाज सर्वेत व्यक्त करण्यात आलाय.
महाराष्ट्रात लोकसभेची निवडणुक आज झाली तर एकूण ४८ जागेपैकी भाजपला २६, शिंदे गटाला ११, राष्ट्रवादी काँग्रेसला ६, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ३ आणि काँग्रेसला २ जागा मिळू शकतात असा अंदाज सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
इंडिया टीव्ही- मॅटराईजने देशातील विविध भागातून हा सर्वे केलेला आहे. ११ जुलै ते २४ जुलै दरम्यान हा सर्वे करण्यात आला. या सर्वेमध्ये ३४ हजार लोकांचा सहभाग होता त्यात २० हजार पुरुष तर १५ हजार महिला होत्या. या सर्वेमधून देशाची जनता नक्की काय म्हणते त्यांना काय हव आहे हे स्पष्ट होतंय असं ही म्हणण्यात येत आहे.