कोण आहे आमिर खानचा मराठमोळा जावई?

अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत साखरपुडा केला आहे. नुपूरने अगदी फिल्मी स्टाईलमध्ये आयराला प्रपोज करुन साखरपुड्याची अंगठी घातली होती. या व्हिडीओची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. २०२० पासून दोघे एकमेकांना डेट करत होते. आयरा आपल्या नात्याबद्दल नेहमीच मोकळेपणाने बोललेली आहे. आता आमिर खानचा जावई म्हणजे चर्चा तर होणारच पण नुपुर काय करतो किंवा तो कोण आहे याची माहिती आपण घेणार आहोत.
नुपूर उत्तर फिटनेस ट्रेनर आणि डान्सर आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना फिटनेसचे प्रशिक्षण दिलेले आहे. तो राज्यस्तरीय टेनिसपटूही होता. त्याचा जन्म पुण्याचा असून शिक्षण मुंबईत झालेलं आहे. इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली आहे. त्याची आई प्रीतम शिखरे या नृत्य शिक्षिका आहेत. आयरा खानला तो गेल्या काही काळापासून फिटनेसचं प्रशिक्षण देत होता. सोशल मीडियावर ते एकमेकांचे अनेकदा फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात आणि त्यांनी आपलं नातं कधीच लपवलं नाही.
नुपूरने अभिनेत्री सुष्मिता सेनलाही फिटनेसचं प्रशिक्षणही दिलं आहे. सुष्मिताने नुपूरकडून दोन वर्षे प्रशिक्षण घेतल्याचं सांगितलं जातं. केवळ सुष्मिता सेनच नाही तर नुपूर हा आमिर खानचाही फिटनेस ट्रेनर होता. नुपूरला खूप आधीपासून ओळखत असल्याने आमिरनेही त्यांच्या नात्याला होकार दिला आहे.