कोण आहे नरेंद्र मोदींचा BFF? या मित्रासमोर पंतप्रधान कधीच खोटं बोलत नाही

देशातील लोकप्रिय नेता कोण असा प्रश्न विचारला तर एकच नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी ! त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला अनेकजण उत्सूक असतात. मग त्यांचे आवडते खाद्यपदार्थ असो वा त्यांचे आवडते पुस्तर किंवा त्यांचा दिनक्रम. विविध मुलाखतीमधून मोदींचे वैयक्तिक आयुष्य कसे आहे याचा उलगडा झालेला आहे. अशाच एका मुलाखतीत मोदींना विचारण्यात आले तुमचा सर्वात खास मित्र कोण आहे?

त्यावर मोदी म्हणाले, प्रत्येकाच्या आयुष्यात एक व्यक्ती अशी असावी ज्याच्या सोबत आपण मुक्तपणे बोलू शकू.तो कायम आपल्याला साथ देईल मग ते सुख असो वा दुःख किंवा सकंटकाळ, ती व्यक्ती कायम आपल्याला प्रोत्साहन देणारी हवी. तो माणूस म्हणून तुम्हाला समजू शकेल अशा प्रकारचा BFF तुमच्याकडे असावा. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास मित्र होते लक्ष्मणराव इनामदार, ते RSS च्या दिवसांपासून त्यांचे सर्वात चांगले मित्र आहेत.त्यांना मोदी प्रेमाने ‘वकील साहब’ म्हणायचे. मोदींच्या व्यक्तीमत्वावर लक्ष्मण राव यांचा खूप जास्त प्रभाव आहे असं म्हटलं जातं. या वकील साहेबांवर मोदींनी एक पुस्तकही लिहिलं आहं. लक्ष्मणराव इनामदार यांचं १९८४ मध्ये निधन झालं. पण आता त्यांच्या आयुष्यात सर्वात खास व्यक्ती कोण आहे? हे सांगण्यात मात्र त्यांनी नकार दिला. कारण जर त्याबाबत त्या व्यक्तीला समजलं तर त्याची वागणूक बदलून जाईल अशी भीती त्यांना आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.