मुंबई महापालिकेवर कोणाचा झेंडा ?

मुंबई महापालिकेवर अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे पण शिंदेंच्या बंडखोरीनंतर आत सगळ्याच पक्षांनी महापालिकेसाठी मोर्चेबांधणी सुरु केलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई महापालिकेवर खास लक्ष केंद्रित केलंय.
शिंदेंकडून खास मोर्चेबांधणी
BMC निवडणुकिच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी आठ जणांच्या नियुक्त केल्या आहेत.मुंबईसाठी पाच विभाग प्रमुख आणि तीन विभाग संघटक यांची नियुक्ती केलीय.त्यांच्यावर पक्षविस्ताराची जबाबदारी सोपवण्यात आलीय.
दादर-माहीम वडाळा या विभाग क्रमांक १० येथून गिरीश धानुरकर यांची विभागप्रमुखपदी तर प्रिया गुरव यांची विभागसंघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.भांडुप विक्रोळी, मुलुंड या विभाग क्रमांक ७ येथून माजी आमदार अशोक पाटील यांची विभागप्रमुखपदी तर राजश्री मांदविलकर यांची विभाग संघटकपदी नियुक्ती करण्यात आलीय.
चेंबूर, सायन, अणुशक्ती नगर विभाग क्रमांक ९ येथून अविनाश राणे यांची विभागप्रमुखपदी तर कला शिंदे यांची विभाग संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या विभाग क्रमांक १२ येथून दिलीप नाईक यांना विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून विभाग क्रमांक ६ येथून आमदार मंगेश कुडाळकर यांची विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलीय.ठाण्यातील माजी नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा दिलाय. आता BMC वर उद्धव ठाकरे की शिंदे की भाजप यापैकी कोण येणार हे पहावं लागणार.