शिवसेना कोणाची?…हे घ्या पुरावे…!!

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनत बंडखोरी केली आणि आता शिवसेनेत दोन गट तयार झालेले आहेत एक आहे शिंदे गट तर दुसरा आहे उद्धव ठाकरे गट. दरम्यान दोन्ही गट म्हणत आहेत आम्हीत खरी शिवसेना आहोत. हा वाद आता सुप्रीम कोर्टात पोहचलेला दोन्ही गटांना 8 ऑगस्टपर्यंत पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आता शिवसेनेचा कोणाची हे ठरविण्यासाठी पुरावे सादर करावे लागतात यासारखे दुसरे दुर्दैव नाही अशी खंत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
ही वेळ फक्त बंडखोर आमदारांमुळे आलेली असून राज्याची ११ कोटी जनता हे उघड्या डोळ्याने पाहत आहे. या गटाचा वापर करुन भाजप शिवसेना फोडण्याचा प्रयत्न करते आहे असा आरोप देखील राऊत यांनी केलेला आहे. पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते. ज्या पक्षामुळे सर्वकाही मिळालं त्याच्या विरोधात बंड केला याबद्दल खंत वाटते असे ही राऊत म्हणालेत
शिवसेना कुणाची? हे घ्या पुरावे..!
शिवसेना कोणाची आहे राज्याच्या 11 कोटी जनतेला माहिती आहे. सीमाप्रश्नासाठी त्यांनी बलिदान दिलं ते 69 हुतात्मे शिवसेनेचे, हजारो आंदोलनातून शिवसैनिक शहिद झाले आहेत, तुरुंगात गेलेले आहेत.१९९२ च्या दंगलीत हजारो शिवसैनिकांवर खटले दाखल आहेत. मराठी माणसाच्या रक्तात शिवसेना आहे. हा खरा शिवसेनेचा पुरावा आहे. पैसा आणि दहशत वापरून भाजप शिवसेनेत फूट पाडत आहे. शिवसेनेतील काही लोकांचा वापर भाजप करतंय हे दुर्दैव आहे असही राऊत म्हणालेत.
बंडखोरांनी पक्षप्रमुखाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांना जनता कधीच माफ करणार नाही. 8 ऑगस्ट रोजी दुपारपर्यंत पुरावे सादर केले जातील, निर्णय कोर्टाच्या हातात आहे पण ११ कोटी जनतेला सांगायची गरज नाही की खरी शिवसेना कोणाची आहे.