बाळासाहेबांचा विश्वासू थापा सांगतो, शिंदेंबरोबर का?

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत अगीद सावलीप्रमाणे असणारे चंपासिंह थापा यांनी देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली आहे. थापा यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. चंपासिंह थापा हे मातोश्रीवर प्रदीर्घ काळ होते. तसंच मोरेश्वर राजे हेदेखील त्यांच्यासोबत होते. आज ठाण्यातल्या टेंभीनाका या ठिकाणी झालेल्या दुर्गेश्वरी मातेच्या आगमन मिरवणुकीमध्ये  चंपासिंह थापा आणि मोरेश्वर राजे यांनी शिंदे गटात दाखल झाले आहेत. 

थापा यांनी शिंदे गटात दाखल होण्याचे कारण सांगितले आहे ते म्हणालेत, मला बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पटतात. तसंच एकनाथ शिंदे यांचेही विचार पटतात. आपल्या मनाने जो कौल दिला तो मी मान्य केला आणि मी शिंदे गटात आलो असे त्यांनी सांगितले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्वाचे विचार पुढे नेत असल्याचे सांगितले. जी चूक २०१९ ला व्हायला नको होती, ती तुम्ही दुरुस्त करत आहात. बाळासाहेब ठाकरेंचे विचार जो कोणी पुढे नेईल. त्याच्याबरोबर सदैव राहील असे म्हणत थापा यांनी बाळासाहेबांच्या आणि हिंदुत्वाच्या विचारांच्या आपल्या शिवसेनेला पाठींबा दिला आहे. थापा शिंदे गटात गेल्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.