‘भाजपा धुतलेल्या तांदळासारखा आहे का?’ वारकऱ्यांचा EDला सवाल, व्हिडीओ व्हायरल

काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत यांचे ट्विट कायम चर्चेत असतात. सध्या त्यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओची नेटकरी चर्चा करत आहेत आणि कमेंट देत आहे. पंढरपूरमध्ये वाराली जाणारा वारकरी अगदी रोखठोकपणे सरकारला प्रश्न विचारतो आहे आणि ते सुद्धा ईडीच्या संदर्भात. आपल्याला माहितच आहे देशभरात ईडी आणि त्याद्वारे केली जाणारी राजकीय नेत्यांची धरपकड गाजते आहे. महाराष्ट्रातसुद्धा आपल्याला हे पहायला मिळालं. याच पार्श्वभूमीवर वारकऱ्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात भाजप, ईडी आणि मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे. 

‘एकनाथ शिंदे एक सर्वसामान्य शिवसैनिक होते. त्यांच्याकडे एवढा पैसा कसा आला? याची चौकशी ईडीवाले का करत नाहीत? असा सवाल सर्वामान्य वारकऱ्याने भाजप सरकारला विचारला आहे. भाजपा सरकारनं आमची वाट लावली. कॉंग्रेसचंच सरकार चांगलं होतं. जो विरोधात बोलतो त्यांच्यावर ते केस करतात. आमच्यावर सुद्धा केस करा. आम्ही जाऊन बसू ईडीच्या तुरुंगात आम्ही घाबरत नाही. भाजपा ईडीचा गैरवापर करत आहे. सगळ्यांच्या मागे तेच लागले आहेत. राज्यातलं सरकार ईडीमुळेच बदललं. राष्ट्रवादी, शिवसेनेच्या मागे ईडी लागते. मग भाजपा वाले धुतल्या तांदळाचे आहेत का? एवढे मोठे बंड करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे पैसे आले कुठून ? याची चौकशी ईडीनं का केली नाही?’ असे बोलत वारकऱ्याने भाजपला चक्क धारेवर धरलं आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.