iPhone भारतात महाग का आहेत?

प्रत्येकाला वाटतं आपल्या कडे iPhone असावा पण त्याच्या किमती पाहून पोटात गोळा येतो. खरंतर iPhone भारतात एवढे महाग का आहेत याचा कधी विचार केलाय का तुम्ही अमेरिकेपेक्षा भारतात iPhoneची किंमत सर्वात जास्त आहे. 

Apple ने 7 सप्टेंबर रोजी iPhone 14 सीरीज लाँच केली. या सीरीजमध्ये कंपनीने चार नवीन स्मार्टफोन लाँच केलेत. यामध्ये त्यांच्या किंमतीही निरनिराळ्या आहे. नुकत्याच लाँच झालेल्या iPhone 14 ची किंमत अमेरिकन बाजारात 799 डॉलर्स (63700 रूपये) पासून सुरू होते. तर भारतात याची किंमत 79900 रूपये इतकी आहे. दोन्ही बाजारपेठांमध्ये 16,200 रूपयांचा फरक आहे. परंतु असं का? 

सीएनबीसीच्या रिपोर्टनुसार असे सांगितले जाते की  भारतात iPhone च्या असेंबलीमुळे किंमत कमी होणार नाही. यामागचं कारण म्हणजे कंपोनंट्सवर आताही ओरिजन इक्विपमेंट्स मॅन्युफॅक्चरर्सना अधिक इंपोर्ट ड्युटी द्यावी लागते. आयफोनमध्ये वापरल्या जाण्याऱ्या प्रिन्टेट सर्किट बोर्ड असेंबलीवर (PCBA) जवळपास 20 टक्के इम्पोर्ट ड्युटी लागते. याप्रकारे आयफोनच्या चार्जरवही 20 टक्के इम्पोर्ट ड्युटी लागते. इम्पोर्ट ड्युटीशिवाय स्मार्टफोन्सवर 18 टक्के जीएसटी आकारला जातो. सध्या भारतात iPhone 12 आणि iPhone 13 असेंबल केला जातो. तसेच डॉलर आणि रुपयामधील वाढणारं अंतरही किंमतीच्या वाढीस कारणीभूत आहे. 

आता मान्य आहे की Apple साठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे. परंतु जोवर याठिकाणी पीसीबीए आणि अन्य कंपोनंन्ट तयार केले जात नाही, तोवर आयफोनसाठी अधिक किंमत मोजावी लागेल. किंमान सध्याच्या इम्पोर्ट ड्युटीच्या नियमांनुसार तरी अशीच परिस्थिती राहिल असे दिसते आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.