भाजपाचा अमेठी पॅटर्न बारामतीत, काय आहे गेम प्लॅन?

एकेकाळी अमेठी हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता पण भाजपने अशी काही रणनीती केली आणि अमेठीवर भाजपचे वर्चस्व आले. आता हाच अमेठी पॅटर्न वापरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कुटुंबीयांचा हक्काचा असलेला बारामती मतदारसंघ काबीज करण्याचा विडा भाजपाने उचलला आहे. 

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बारामतीचा दौरा करुन, भाजपाची रणनीती काय असणार आहे.देशात ज्या मतदारसंघात भाजपा दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर होती, असे मतदारसंघ निश्चित करण्यात आले असून, त्या ठिकाणी भाजपा येत्या दोन वर्षांत जोर लावणार आहे.अमेठीप्रमाणेच येत्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ हा देशाचे केंद्र बिंदू ठरण्याची शक्यता आहे. शरद पवार आणि त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना आव्हान देण्यासाठी या मतदरासंघाची जबाबदारी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे सोपण्यात आलीय.त्यांच्याकडे बारामती मतदारसंघाचे प्रभारीपद देण्यात आलंय. येत्या 18 महिन्यांत सीतारमण यांचे बारामती मतदारसंघात अनेक दौरे होण्याची शक्यता आहे. या महिन्यातही सीतारमण यांचा तीन दिवसांचा दौरा बारामतीत होणार आहे.

शरद पवारांचा अश्वमेध रोखण्यासाठी भाजपाने तयारी सुरु केलीय.राम शिंदे, दौंडमध्ये राहुल कुल, खडकवासल्यात भीमराव तापकीर, इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुंरदरमध्ये शिंदे गटात आलेले विजय शिवतारे या नेत्यांच्या साथीने आणि केंद्रीय मेतृत्वाच्या मदतीने बारामती जिंकण्याचा विडाच भाजपाने उचलेला आहे.शरद पवार यांना केंद्रीय पातळीवर सक्रिय होण्यापूर्वीच त्यांना त्यांच्या होमपिचवरच रोखण्याचीही भाजपाचा प्रयत्न असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.