ठाकरेंना धनुष्यबाण परत मिळणार? उज्वल निकम यांनी स्पष्टचं सांगितलं..

निवडणूक आयोगाने काल ठाकरे आणि शिंदे गटाची नावे निश्चीत केली असून ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिलेले आहे. यावर ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, कोणत्याही राजकीय पक्षांना आयोगाने प्रसिद्ध केलेल्या सूचीमधूनच निवडणूक चिन्ह द्यावं लागतं. ठाकरे गटाला त्यामधूनच मशाल चिन्ह मिळालेले आहे.पण शिंदे गटाने जी तीन नावे सुचवलं होती ती आयोगाच्या सूचीमध्ये नव्हती. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा चिन्ह निवडण्याची संधी देण्यात आलेली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरीमधील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवले. त्याविरोधाच उद्धव ठाकरेंच्या वतीने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. त्यात निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती द्या असे म्हटले आहे. त्यावर दोन दिवसात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान ठाकरे गटाला धगधगती मशाल हे चिन्ह कसे मिळालं यासंदर्भात निकम यांनी भाष्य केलंय. दिल्ली हायकोर्टात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेत म्हटलंय जुनं निवडणूक चिन्ह म्हणजे धनुष्यबाण त्यांना मिळावे. यावर मंगळवारी किंवा बुधवारी सुनावणी होऊ शकते. पण या सुनावणीत काय होईल, न्यायालय निवडणूक आयोगाचा निकाल कायम ठेवणार की रद्द करणार किंवा त्यात बदल करणार हे आपल्याला सुनावणीनंतर कळू शकेल असे निकम म्हणाले आहेत.