एकनाथ शिंदे यांना हरवण्याची ही स्ट्रॅटेजी शिवसेनेच्या कामी येणार?

एकनाथ शिंदे यांनी बंड केला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात जणू काही भूकंप आला. महाविकासआघाडी सरकार पडलं आणि शिंदे-फडणवीस सरकार राज्यावर आलं. एकेकाळी युती करणारी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप पक्के हाडवैरी झालेले आहेत. खासदार, आमदार, शाखप्रमुख अनेकांनी शिवसेनेची साथ सोडली. शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि युवानेते आदित्य ठाकरे अथक मेहनत करताना दिसतायेत. 

दरम्यान शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत युती केली. जर एकनाथ शिंदे यांना शह द्यायचा असेल तर प्रत्येक प्रयत्न आपल्याला करावा लागणार हे उद्धव ठाकरे यांना माहित आहे. म्हणून उद्धव ठाकरे सुद्धा शिंदे यांना शह देण्यासाठी एक ही घटका किंवा घटना सोडत नाहीएत. आता शिंदेंना थांबविण्यासाठी ठाकरेंच्या मदतीला संभाजी ब्रिगेड सरसावली आहे. ब्रिगेडने उद्धव ठाकरेंच्या सेनेला भक्कम साथ देण्याचे ठरविले आहे. १७ सप्टेंबर रोजी प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती भव्य पद्धतीत करण्याचा निर्धार संभाजी ब्रिगेडने केलाय. शिंदे- फडणवीस यांच्या हिंदुत्ववादाला, संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना मिळून पुरोगामी पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत. 

प्रबोधनकार ठाकरे यांच्या सर्वसमावेशक, बहुजनवादी आणि पुरोगामी राजकारणाचा वारसा ठाकरे यांच्या घरात आहे. पण बाळासाहेबांनी हिंदुत्वाची कास धरल्यामुळे शिवसेना या वारश्यापासून दुरावली होती. आता संभाजी ब्रिगेडने हात मुद्दा हातात घेतला आहे आणि प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती भव्य पद्धतीत करण्याचा निर्धार केलाय. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.