ठाकरे बंधूंची होणार युती? ठाकरे परिवारातील व्यक्ती म्हणाली….

जूनच्या अखेरीस झालेली महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील मोठी घडामोड होती. त्यातून निर्माण झालेला राजकीय संघर्ष रोज नवनवीन वळणं घेत आहे. शिंदे विरुद्ध ठाकरे यांच्या संघर्षात निवडणूक आयोगाने धनुष्य बाण चिन्हाला बाजूला करून दोघांना वेगवेगळी चिन्हे दिली आहेत. ‘शिवसेना’ या मूळ नावात बदल पक्षांची नावं आता बदलली आहेत. आता पुढं काय होणार यांवर चर्चा रंगू लागली आहे. आता चर्चेला महत्वाचा मुद्दा येतो आहे तो म्हणजे ठाकरे बंधूंची युती होणार का?

हाच प्रश्न ठाकरे परिवारातील एका व्यक्तीला विचारला गेला. जयदेव ठाकरे यांचे चिरंजीव जयदीप ठाकरे हे माध्यमांसोबत संवाद साधत होते. तेव्हा काही पत्रकारांनी जयदीप यांना विचारलं की राज्यातील राजकीय घडामोडी पाहता सगळ्या ठाकरेंनी एकत्रित व्हायला हवं का? तुमचं काय मत आहे?

यांवर बोलताना जयदीप ठाकरे यांनी थेट आपलं म्हणणं मांडलं. जयदीप बोलले की, ‘नक्कीच एकत्रित व्हायला हवं.’ जयदीप यांच्या या मतावरून ठाकरेंची कौटुंबिक व राजकीय युती होणार का? ही चर्चा आता जोर धरू लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.