WhatsApp मध्ये येणार हे महत्त्वाचे फिचर

इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्सला बेस्ट अनुभव देण्यासाठी नवीन फीचर आणत आहे. आताही नवीन फीचरवर व्हॉट्सअॅप काम करत आहे. ज्यामध्ये वापरकर्ते एकापेक्षा जास्त डिव्हाइसवर व्हॉट्सअॅप सुरू करू शकणार आहेत.
व्हॉट्स अॅपच्या नव्या फिचरबद्दल सांगायचं झालं तर Wabetainfo ने रिपोर्टनुसार, यूजर्संना एकच व्हॉट्सअॅप अकाऊंट एकापेक्षा अधिक डिव्हाईसेसवर वापरणं सोपं होणार आहे. या फिचरच्या मदतीने आता तुम्हाला एक व्हॉट्सअॅप अकाऊंट दोन मोबाईलबरोबरच डेस्कटॉप, टॅब आणि इतर डिव्हाईसेसवरही वापरता येणार आहे.
रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार जेव्हा यूजर्स एक व्हॉट्सअॅप अकाऊंट दुसऱ्या मोबाईलमध्ये अॅक्टिव्हेट (सक्रिय) करेल. ज्याच्या मदतीने वापरकर्ते दुय्यम डिव्हाइसची लिंक शेअर करू शकतील, त्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसली तरीही ते चालू शकणार आहे. महत्वाचं म्हणजे सर्वच चॅट सुरक्षितपणे दुसऱ्या मोबाईलमध्ये कॉपी होणार आहे.
अशी माहीती आहे की, या फिचरने चार वेगवेगळ्या डिव्हाइसेसपर्यंत तुम्ही Whatsapp Account कनेक्ट करू शकणार आहात. फिचरच्या निश्चिततेबाबत कंपनीकडून घोषणा होण्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. सध्या हे फिचर डेव्हलप केलं जात असल्याची माहीती आहे. हे फिचर आल्यानंतर याचा उपयोग अनेक क्षेत्रातील लोकांना फायद्याचा ठरणार आहे.
Wabitinfo या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, Whatsapp यूजर्स दुसऱ्या मोबाईलमध्ये लिंकच्या मदतीने कनेक्ट होऊ शकतात. जर तुमच्याकडे दोन स्मार्टफोन असतील आणि तुम्हाला जर एकाच सिमवर दोन्ही स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप चालू करायचे असेल तर यासाठी पहिल्या डिव्हाईस किंवा स्मार्टफोनमधून तयार झालेली लिंक दुसऱ्या स्मार्टफोनवर तुम्हाला पाठवावी लागणार आहे. यामुळे तुम्ही तुमच्या फोनमध्ये इंटरनेटशिवाय व्हॉट्सअॅप सुरू ठेवू शकणार आहात.