आजच्या बातम्या1महाराष्ट्र

उद्या मतदान आहे मतदान शब्द छोटा आहे पण जबाबदारी खूप मोठी!

Spread the love

खास करून अशावेळी जेव्हा मागील पाच वर्षात महाराष्ट्राने याआधी कधीही न पाहिलेले सत्तेसाठीचे राजकारण पहिले. त्यामुळे उद्या मतदान करायला जाताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात झालेले सर्व उलटफेर आपण पहिले आहेत, त्यामुळे परत तेच सर्व जाणून घेण्यापेक्षा या मागील ५ वर्षांची थोडक्यात टाइम लाईन पाहुयात. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीचे मतदान २१ ऑक्टोबर २०१९ ला झाले. २४ ऑक्टोबर २०१९** ला विधानसभा निवडणुकांचा निकाल: लागला त्यानंतर २३ नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट होती, त्यानंतर सत्तेसाठी झालेली राजकीय उलथापालथ आपण पाहिली शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी तर्फे महाविकास आघाडीचा घाट घालण्यात आला. पण २३ नोव्हेंबर २०१९* ला देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनि पहाटेचा शपथविधी करत नवे समीकरण उभे केले पण त्यांचं हे सरकार अवघ्या काही तासाचंच होत, त्यानंतर **२८ नोव्हेंबर २०१९ ला महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी:सोहळा पार पडला, व उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, पण २० जून २०२२ ला एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं व शिवसेनेतील ३९ आमदार गुवाहाटीला रवाना झाले. परिणामी २९ जून २०२२ला उद्धव ठाकरे यांना राजीनामा दिला व ३० जून २०२२ ला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर २ जुलै २०२३ ला शिंदे- फडणवीस यांच्या महायुती मध्ये अजित पवारांची एन्ट्री झाली. व त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आणि या सगळ्या राजकीय नाट्यात ५ वर्ष सरली आणि पुन्हा निवडणुकांची घोषणा झाली.

महाराष्ट्रामध्ये विविध प्रशासकीय यंत्रणांचा गैरवापर झाल्याचा आरोप झाला आणि हा आरोप प्रत्येका सरकारने एकमेकांवर केला इडी,सीबीआय, पोलीस खात कुठलीच यंत्रणा यातून सुटली नाही त्यामुळे ना भूतो न भविष्यती अशी राजकीय समीकरणे महाराष्ट्राला पहावी लागली. आणि या यंत्रणांवर असणारी विश्वासार्हता कुठेतरी कमी झाली, व सत्तेचा कुठंवर गैरवापर केला जाऊ शकतो हे संबंध महाराष्ट्राने पहिले. तर सोबतच धनगर, मराठा यांसारखे अनेक समाज आरक्षणासाठी आग्रही आहेत ज्याचा फायदा घेत सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात जातीयवाद भडकवण्याचा प्रयत्न देखील अनेक जण करतात. यासोबतच राज्यपालांपासून ते अनेक नेतेमंडळींनी अनेकदा महाराष्टाच्या भूमीत जन्मलेल्या महापुरुषांचा अपमान केला. पण त्यावर आक्षेप नोंदवण्याशिवाय कोणीही काहीहि केलं नाही.

महाराष्ट्र हे भारतातील सर्वात जास्त GST देणारे राज्य आहे पण या श्रीमंत राज्यात आजही पाण्याच्या समस्या, चांगल्या आरोग्य सुविधांचा अभाव, बेरोजगारी अशा अनेक समस्या पाहायला मिळतात. आजही महाराष्ट्रासारख्या भारतातील सर्वात प्रगतशील राज्यामध्ये आम्ही तुम्हाला रोजगार देऊ, आम्ही तुम्हाला पाण्याची उत्तम सोय उपलब्ध करून देऊ यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर निवडणूक लढवली जाते. आजही रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा असणे, अस्वछता, आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता असे प्रॉब्लेम्स पहायला मिळतात तर मागील काही काळामध्ये याच अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे अनेक नवजात बालके व रुग्णांना त्यांचा जीव देखील गमवावा लागला आहे. महाराष्ट्र स्थापन होऊन सहा दशक उलटून गेली पण या काळात आपण साध्या आपल्या मूलभूत समस्या देखील, का सोडवू शकलो नाही? याच उत्तर आहे का कोणाकडे?प्रत्येक जण महाराष्ट्राचा विकास करू, आम्ही महाराष्ट्राला प्रगतशील बनवू अशा विविध घोषणा करतो पण या घोषणा फक्त कागदापुरत्यास मर्यादित राहतात.

maharashtrakatta.in

Maharashtra Projects

  • महाराष्ट्र राज्यावर जवळपास सात लाख कोटींचं कर्ज देखील आहे. त्यामुळे आज वरच्या सरकारांनी जो काही नावापुरता विकास केला त्या विकासाच्या बदल्यात महाराष्ट्र राज्यावर भला मोठा कर्जाचा डोंगर उभा केला आहे. ज्याचा भार हा त्यांना नाही तर महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांना उचलावा लागणार आहे. याउपर महाराष्ट्रातील तीन मोठे प्रोजेक्ट्स व हिंजवडी मधील अनेक IT कंपन्या महाराष्ट्र सोडून गुजरात मध्ये गेल्या आहेत. अर्थात समुद्रातून दोन-तीन थेंब पाणी काढलं तर समुद्राला फरक पडत नाही, पण या ३ प्रोजेक्ट्स व कंपन्यांमुळे मुळे निर्माण होणारे हजारो रोजगार गेले तर आधीच बेरोजगारीच्या समस्येने हैराण असलेल्या महाराष्ट्राला नक्कीच फरक पडतो.
  • सध्या आपल्या महाराष्ट्राची गुनेहगारांचा महाराष्ट्र अशी नवी ओळख निर्माण होऊ लागली आहे. ज्याच कारण आहे महाराष्ट्रात वाढणार गुन्हेगारीचं प्रमाण सरार्स होणार गोळीबार, पुणे पोर्शे कार प्रकरण, बाबा सिद्दीकी यांची हत्या, ड्रग्जची तस्करी, यांसारख्या अनेक गुन्ह्यांमुळे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेंचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासोबतच महाराष्ट्रात दररोज 21 बलात्काराची प्रकारणे नोंदवली जातात. त्यामुळे जिजाऊंच्या महाराष्ट्रात महिलांचं सुरक्षित नाहीयेत. तर महाराष्ट्रातील 62 लाख युवक अद्याप बेरोजगार आहेत, बेरोजगारी असतानाही राज्यातील 2 लाखांहून अधिक सरकारी पदे रिक्त आहेत. तर पेपर लीक झाल्याने PSI, तलाठी आणि शिक्षक भरती यांसारख्या परीक्षा सुरळीत पार पडल्या नाही. त्यामुळे विद्यार्थी नाराज असून विद्यार्थी आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे.

कोणत्या सरकारने काय काम केलं? त्यांनी आपल्या मताचा किती आदर ठेवला? आपले मूलभूत प्रश्न आजही तसेच का आहेत? यासोबतच प्रशासकीय यंत्रणांचा होणार गैरवापर, शेतकरी आत्महत्या, गुन्हेगारी, जातीयवाद आणि महाराष्ट्रावर असलेलं कर्ज या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करा. कारण यांचा आपल्या जीवनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे उद्या मतदान करताना नीट विचार करून मतदान करा! महाराष्ट्राच्या हितासाठी, तुमच्या आमच्या सुरक्षित भविष्यासाठी आणि आपल्याला अभिप्रेत असलेल्या महाराष्ट्रासाठी.

Follow More on maharashtrakatta.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *