ट्रेडिंग1निवडणूक २०२४-1

कोण होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?

Spread the love

Who will be chief minister of maharashtra after elections

मांडवली करत तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती करत अखेर महायुती व महाविकास आघाडी या दोघांचाहि जागावाटपाचा खेळ उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत चालला. जागा वाटपासाठी एवढा वेळ घेणाऱ्या महायुती व महाविकास आघाडीमध्ये आता मुख्यमंत्रीपदासाठी किती वाट्या-घाट्या होतील अन दिल्लीतून होणाऱ्या कोणत्या डोंबाऱ्याच्या खेळांमधून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून कोण समोर येईल हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. म्हणूनच महायुती व महाविकास आघाडी या दोघांमध्ये कोण मुख्यमंत्री होऊ शकतो? कोणाचे किती चान्सेस आहेत? हेच जाणून घेऊयात.

नमस्कार…..

गेल्या पाच वर्षातील महाराष्ट्रातलं राजकारण हे मुख्यमंत्री पदासाठी आणि मुख्यमंत्री पदाभोवती फिरताना आपल्याला दिसल. ज्यात मुख्यमंत्री पद न मिळाल्याने शिवसेनेने भाजपसोबत असलेली आपली युती तोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडीची स्थापना केली. तर त्यानंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमध्ये बंडखोरी करत भाजप सोबत जाऊन महायुतीचे सरकार स्थापन केले. त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकांनंतर महायुती व महाविकासआघाडी मधून कोण मुख्यमंत्री होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सर्वात पहिलं बोलूयात महाविकास आघाडी बद्दल. 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये अतिशय उत्तम प्रदर्शन केल्यानंतर महाविकास आघाडीच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या असून महाविकास आघाडीला तेच विजयी होणार असा विश्वास वाटू लागला आहे व त्यांच्या या विश्वासाप्रमाणे जर महाविकास आघाडी विजयी झाली तर महाविकास आघाडीत नक्की कोण मुख्यमंत्री होणार हा मोठा प्रश्न समोर असेल. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपात मोठा भाऊ ठरलेल्या काँग्रेसकडून नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब थोरात यांची नावे मुख्यमंत्री पदासाठी दिली जाऊ शकतात. ज्यातील नाना पटोले यांचं नाव आघाडीवर राहण्याची शक्यता आहे. तर आता शिवसेना उबाठा गटाचा विचार केला तर त्यांच्याकडून एकच नाव समोर येतं ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे व नुकत्याच केल्या गेलेल्या काही सर्वेज मध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सर्वाधिक पसंती दिल्यामुळे महाविकास आघाडी कडून उद्धव ठाकरे यांचा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केला जाण्याची शक्यता आहे. किंबहुना त्यांनी तसं केलं तर त्याचा फायदा नक्कीच मविआला होऊ शकतो, आणि आता राहता राहिला प्रश्न राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा तर त्यांच्याकडून जयंत पाटील यांचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी पुढे केला जाऊ शकतो मात्र राष्ट्रवादी मुख्यमंत्री पदासाठी जास्त आग्रही नसल्याचे चित्र पाहायला मिळत असून एका मुलाखतीदरम्यान मला सर्वात पाहिलं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षउभारणीवर भर द्यायचा आहे, मुख्यमंत्रीपद व इतर पदे त्यानंतर माझ्यासाठी येतात असं भाष्य जयंत पाटलांनी केलं होत त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस व शिवसेना यांच्यामध्येच रस्सी खेच होण्याची शक्यता आहे. ज्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या यादीमध्ये सर्वात वर राहण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीनंतर आता जाऊयात महायुतीमध्ये. जर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं तर महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? यासाठी मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये अजित पवार, एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस या तिघांमध्ये मुख्यमंत्री पदाची शर्यत होताना दिसेल. ज्यात अजित पवार कुठेतरी मागे पडताना दिसतात. लोकसभेत केलेल्या निराशाजनक कामगिरी नंतर जागा वाटपामध्ये देखील अजित पवारांना फक्त 55 जागा मिळवण्यात यश मिळाल आहे. यातील किती त्यांच्या जागा निवडून येतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे अजित पवार यांचे मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस तसे धूसरचं दिसत असून उपमुख्यमंत्री पद तरी त्यांना मिळेल कि नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये टप फाईट होण्याची शक्यता आहे. जागावाटपात १४९ जागा लढवत भाजपा महायुतीमध्ये मोठा भाऊ ठरलेला तर आहेच व निकालानंतर जिंकलेल्या जागांमध्ये देखील जर भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे मात्र शिवसेना शिंदे गट हा एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असल्याने एकनाथ शिंदे देखील मुख्यमंत्री पदावर दावा सांगतील, त्यामुळे मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये कलह निर्माण होऊ शकतात, पण त्यातूनही महायुतीकडून देवेंद्र फडणवीस यांचा चेहराच मुख्यमंत्री पदासाठी पुढे केलाजाण्याची दाट शक्यता असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करतात.

मुख्यमंत्री पदामुळे गेल्या ५ वर्षात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली असून आता पुन्हा मुख्यमंत्री पदामुळे राज्यातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलू शकतात. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा मान कोणाला मिळणार? हे पहाणं आता महत्वाचं ठरणार आहे. तर तुमच्या आवडीचा, तुमच्या पसंतीचा मुख्यमंत्री कोण? ते आम्हाला कंमेंट ….