अमित शहा यांनी काल संसदेमध्ये केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरां बाबतच्या वक्तव्याचे पडसाद संसदे सोबतच महाराष्ट्राचे विधान भवन व संपूर्ण देशभरात उमटायला लागले आहेत. दरम्यान "काँग्रेसने माझ्या पूर्ण भाषणातील एक छोटासा भाग दाखवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे" असा आरोप अमित शहा यांच्याकडून केला जात आहे. म्हणूनच या अर्ध्या व्हिडिओ मागचं पूर्ण सत्य काय आहे? आणि कालच्या तातडीच्या पत्रकार परिषदेत यावर अमित शहांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तेच जाणून घेऊयात
आज-काल एक फॅशन झाली आंबेडकर,आंबेडकर ,आंबेडकर ,आंबेडकर . एवढं नाव जर एखाद्या देवाचं घेतलं असतं तर सात जन्म स्वर्ग मिळाला असता” या अमित शहांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला. यावरून अमित शहा यांना अनेकांनी ट्रोल केलं, अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. मात्र अमित शहा फक्त एवढेच म्हणाले का? तर नाही. हा अमित शहा यांनी भाषणाला सुरुवात केल्याच्या सुरुवातीचा एक छोटासा व्हिडिओ आहे. आंबेडकरांबाबत हे वक्तव्य केल्यानंतर पुढे अमित शहांनी काँग्रेस कशी आंबेडकर विरोधी होती, काँग्रेसने कसे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जाऊन निर्णय घेतले होते या सगळ्याबद्दल भाष्य केल आहे.
अमित शहांनी संसदेत या मुद्द्यावर जवळपास सहा सात मिनिटे भाषण केलं आणि या भाषणाच्या सुरुवातीला अमित शहांनी हे स्टेटमेंट दिलं होतं. तर पुढे याबद्दल बोलत अमित शहांनी बाबासाहेब व काँग्रेसच्या विचारसरणीमध्ये कसा विरोधाभास होता हे सांगत त्यांनी मंत्री पदाचा त्यांनी दिलेला राजीनामा, कलम 370 याचा त्यांनी केलेला विरोध या सगळ्याचे दाखले देखील दिले.तर अमित शहांनी केलेल्या या वक्तव्याचे पडसात संसदे सोबतच अनेक राज्यांच्या विधिमंडळात व संपूर्ण देशभरात उमटू लागले होते, अनेक लोकांकडून अमित शहा यांच्यावर टीका केली जात होती, आणि म्हणूनच काल संध्याकाळच्या सुमारास अमित शहांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावली. या पत्रकार परिषदेमध्ये अमित शहा नेमके काय म्हणाले आहेत ते आता पाहूयात.
“संसदेतील संविधानावरील चर्चेदरम्यान काँग्रेस पक्ष आंबेडकर विरोधी, संविधान विरोधी,आरक्षण विरोधी आणि ओबीसी विरोधी आहे हे स्पष्ट झाले. काँग्रेस पक्षाने माझ्या विधानाचा विपर्यास करून त्यातील एक छोटासा भाग निवडकपणे जनतेसमोर सादर केला आणि जनतेमध्ये गोंधळ पसरवण्याचा प्रयत्न केला. समाजात तथ्य विकृत करणे आणि खोटेपणा पसरवणे ही काँग्रेस पक्षाची जुनीच सवय आहे. मी अशा पक्षातून आणि संस्कृतीतून आलो आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा कधीही अनादर करू शकत नाही. किंबहुना त्यांचा अपमान करण्याचा ते कधी स्वप्नातही विचार करू शकत नाही. पंडित नेहरूंपासून चौथ्या पिढीपर्यंत काँग्रेस कुटुंबाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सातत्याने बाजूला केले, आणि त्यांचा विरोध देखील केला होता. पंडित नेहरूंचा बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा द्वेष सर्वज्ञात आहे. काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना मंत्रिमंडळातून राजीनामा देण्यास देखील भाग पाडले होते. तर निवडणुकीत त्यांचा पराभव सुनिश्चित करण्यासाठी सर्व शक्ती वापरली होती. काँग्रेस पक्षाच्या दोन पंतप्रधानांनी स्वतःला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तो पुरस्कार प्रदान केला नाही. ” असं म्हणत अमित शहांनी काँग्रेसवर टीका केली आहे. तर त्यांच्या वक्तव्यावर देखील सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान अमित शहांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केलेली असताना देखील, अनेकांनी अमित शहांच्या या वक्तव्याविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली असून, काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगेंनी अमित शहा यांचा राजीनामा देखील मागितला आहे. ज्यावर “खरगेंची इच्छा असेल तर मी राजीनामा देखील देईन पण त्याने काँग्रेस पक्षाला काही फारसा फरक पडणार नाही” असं म्हणत अमित शहा यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.
तर तुम्हाला काय वाटतं खरंच अमित शहांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला का? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला…