Mahayuti Manifesto | महायुती सरकारचा जाहीरनामा
कोल्हापूर मधील प्रचार सभेत, महायुती सरकारने मोठ्या घोषणा केल्या असून सत्तेत आल्यावर या वचनांची पूर्तता होणार असल्याची ग्वाही दिली आहे.
महायुतीची दहा वचन
१) लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून सध्या पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये देण्यात येत आहेत, ही रक्कम वाढवून 2100 रुपये देणार. तसंच महिला सुरक्षेसाठी २५,००० महिलांची पोलीस दलात भरती करण्यात येणार.
२) कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 15000 रुपये अनुदान देणार सध्या प्रत्येक वर्षाला शेतकरी सन्मान योजनेद्वारे १२,००० रुपये देण्यात येतात याची रक्कम वाढवून ती १५,००० रुपये करण्यात येणार आहे. तसंच MSPवर २० टक्के अनुदान येणार.
३) प्रत्येकाला अन्न आणि निवारा प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचं यावेळी महायुतीकडून राज्यातील नागरिकांना देण्यात आलं आहे.
४) वृद्ध पेन्शन धारकांचा निधी वाढवून २१०० रुपये करणार राज्यातील वृद्ध पेन्शनधारकांचा निधी वाढवून महिन्याला १५०० ऐवजी २१०० रुपये देणार.
५) जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार राज्यातील वाढलेल्या महागाईपासून दिलासा देण्यासाठी पुन्हा सत्तेत आल्यास जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन महायुतीनं राज्यातील जनतेला दिलं आहे.
६) २५ लाख नवे रोजगार तसंच १० लाख विद्यार्थ्यांना १०,००० रुपये विद्यावेतन देणार Enrol Now इंडिया बनेगा India Ai राज्यात नवे २५ लाख रोजगार निर्माण ककरणार तसंच प्रशिक्षणातून महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना १०,००० विद्यावेतन देण्याचे वचन यावेळी महायुतीकडून देण्यात आलं आहे.
७) ४५,००० गावांत पांदण रस्ते बांधणार राज्यातील ४५,००० गावांमध्ये पांदण रस्ते बांधण्याचं वचन महायुतीकडून देण्यात आलं आहे.
८) अंगणवाडी आणि आशा सेविकांना १५००० रुपये आणि सुरक्षा कवच अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना महिन्याला १५,००० वेतन आणि संरक्षण देण्याचे वचन!
९) वीज बिलात ३० टक्के कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचं वचन
१०) सत्तेत आल्यास ‘व्हिजन महाराष्ट्र @ २०२९’ मांडणार सत्तेत आल्यास १०० दिवसांच्या आत २०२९ चं महाराष्ट्राचं व्हिजन डॉक्यमेंट सादर करणार.