jarange factor यावेळेस कोणाला दणका देणार?
jarange and vidhansabha election2024
मराठा आरक्षणासाठी संघर्षाची मशाल पेटवणारे, १३ महिन्यांत ६६ दिवस उपोषण करून या आंदोलनाचा चेहरा बनलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या प्रभावामुळे मराठवाड्यात भाजपाला एकही जागा जिंकता आली नाही. सोबतच पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे अश्या मातब्बर दिगज्जांचा पराभव या निवडणुकीत झाला होता, ज्याचं मुख्य कारण होत ते म्हणजे जरांगे फॅक्टर, म्हणूनच यंदा विधानसभेला जरांगे फॅक्टर कोणाला दणका देणार तेच जाणून घेऊयात.
लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यातील सात लोकसभा मतदारसंघात मराठा मतांचा प्रभाव दिसून आला. परिणामतः मराठवाड्यात भाजपला एकही जागा मिळाली नाही, व लोकसभेनंतर आता मराठवाड्यातील विधानसभेच्या मतदारसंघावर देखील जरांगे यांचा थेट परिणाम दिसून येईल, तसेच नाशिक, सोलापूर, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यांमधील मतदार संघांवर देखील जरांगे यांचा प्रभाव पडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आता जरांगे पाटील कोणत्या नेत्यांना damage करू शकतात ते पाहुयात. जरांगे फॅक्टरचा सर्वात जास्त जर कोणावर परिणाम होण्याची शक्यता असेल तर ते म्हणजे छगन भुजबळ. जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाची लढाई लढत असताना त्यांना सगळ्यात जास्त विरोध झालो तो छगन भुजबळ यांचाच.. आणि याचमुळे मराठा समाजाचे विरोधक असल्याची त्यांची प्रतिमा निर्माण केली. त्यामुळे छगन भुजबळांना जरांगे फॅक्टर चा मोठा फटका बसू शकतो असे मत अनेक राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
या यादीतील पुढचं नाव आहे धनंजय मुंडे यांचं. बीड लोकसभा निवडणुकीवेळी रंगलेला मराठा-वंजारी वादाचा फटका बसला तो पंकजाताई मुंडेना… त्यांचा झालेला हा पराभव खूप अनपेक्षित होता व या पराभवामागचं सर्वात मोठं कारण होत जरांगे पाटील. त्याच पार्श्वभूमीवर परळी विधानसभेत देखील वंजारी समाजाचे नेते असलेले धनंजय मुंडे यांना देखील मराठा वंजारी वादाचा अन् जरांगे पाटील यांचा मोठा फटका बसू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.
भुजबळ व मुंडे यांच्यानंतर जरांगे फॅक्टर मोठं damage करू शकतो तो संतोष दानवे व संजना जाधव यांना. जालना लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यांनतर त्याचे चरंजीव संतोष दानवे यांना भोकरदन मतदारसंघातून तर त्यांची मुलगी संजना जाधव यांना कन्नड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाचा महाराष्ट्रात झालेला मराठा आरक्षण विरोधी चेहरा त्यामुळे या दोघांनाही, खासकरून दानवेंचे पुत्र संतोष दानवे यांना जास्त फटका बसणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या सर्वांसोबतच राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून जरांगेंची मनधरणी करण्यासाठी गेलेल्या भाजपचे संकटमोचक गिरीश महाजनांना देखील याचा फटका बसू शकतो कारण जरागेंनी अनेक सभांमधून गिरीश महाजनांनवर टीका केली होती. तसेच त्यांच्या जामनेर मतदारसंघात असलेला मराठा समाजाचे voteing हे सर्वाधिक असल्याने व त्यांच्यावर मराठा आरक्षण विरोधी म्हणून झालेली टीका त्यांना महागात पडेल अशी त्यांच्या मतदारसंघात चर्चा आहे.
तर लोकसभेत भाजपाला damage करणारा जरांगे पॅटर्न आता विधानसभेत कोणाला damage करणार, पुन्हा मराठा मतदार एकवटणार का? मराठा आरक्षणावर याचा कसा फायदा होणार हे पाहणं महत्वाच ठरणार आहे. तुमच्यामते जरांगे फॅक्टर कोणाला damage करणार ते आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा.