२६डिसेंबरला लडाखमधील भारत-चीन सीमे जवळील पँगॉन्ग तलाव परिसरात भारतीय लष्कराने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्या नंतर, त्यांच्या या कृत्याचे अनेकांनी स्वागत केले, त्यावर स्तुतीसुमने उधळली. तर २ दिवस प्रत्येकाच्या स्टेटस, स्टोरी सगळीकडे याचा विडिओ होता. पण अश्यातच आता या पुतळ्यावरून नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय आहे तेच जाणून घेऊयात आजच्या
पँगॉन्ग त्सो तलाव हा पूर्व लडाखमध्ये स्थित एक उच्च उंचीवरील तलाव आहे. हा तलाव भारत आणि चीन यांच्यातील तणावाचे केंद्र आहे. हा प्रदेश अजूनही अत्यंत संवेदनशील असून लडाखमधील भारत-चीन सीमे जवळील पँगॉन्ग तलाव परिसरात भारतीय लष्कराने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. तर हा पुतळा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील भारतीय लष्कराच्या बदललेल्या रणनीतीचे प्रतिबिंब असल्याचं म्हंटलं जात आहे. लडाखमध्ये रस्ते, पूल आणि कायमस्वरूपी बंकर यासह लष्कर वेगाने पायाभूत सुविधा निर्माण करत आहे, जेणेकरून भविष्यातील कोणत्याही संकटाला ते जोरदार प्रत्युत्तर देऊ शकतील. आणि याच बदलेल्या रणनीतीचे प्रतिक म्हणजे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे.
या प्रदेशातील शिवरायांच्या पुतळ्याची उपस्थिती भारताची सांस्कृतिक वैभवता तर दर्शवते, सोबतच सामरिक दृष्ट्या देखील अतिशय महत्वाची ठरते. परंतु यामुळे लडाखच्या वारसा आणि पर्यावरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सध्या केला जात आहे. ” हा पुतळा उभारण्या आधी स्थानिक समुदायाशी सल्लामसलत करण्यात आली नव्हती, आमचे खास वातावरण आणि येथील विविध वन्यजीव यांचा विचार करून स्थानिक लोकांशी सल्लामसलत न करता हा पुतळा बांधण्याचा निर्णय एकप्रकारे आम्हा स्थानिकांवर लादण्यात आला होता. यामुळे आमच्या अद्वितीय पर्यावरण आणि वन्यजीवांच्या संदर्भात त्याच्या प्रासंगिकतेबद्दल प्रश्न उपस्थित होत असून, आपल्या समाजाचा आणि निसर्गाचा खरोखर आदर करणाऱ्या प्रकल्पांना आपण प्राधान्य दिले पाहिजे. असे मत व्यक्त करत चुशुलचे काउन्सिलर कोंचोक स्टॅनजिन यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा शौर्य, दूरदृष्टी आणि अतूट न्यायाचे प्रतीक आहे. असे लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने त्यांच्या एका निवेदनात म्हटले आहे. आणि हा पुतळा उभारण्या मागचे कारण स्पष्ट केले आहे. तर यावर तुमचे मत काय ते कंमेंट करून नक्की सांगा…