आजच्या बातम्या1ट्रेडिंग1महाराष्ट्रमुंबई

MNS मुळे कोणाची दांडी गुल होणार?| Raj Thackeray | MVA |

Spread the love

लोकसभेला भाजपला जाहीर पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी ‘विधानसभेच्या तयारीला लागा!” असा संदेश त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला होता. त्यानुसार यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे फुल फॉर्म मध्ये उतरले आहेत. त्यामुळे आता मनसेचे किती व कोणते आमदार निवडून येणार हे पाहणं औत्सुक्याचे असेल पण त्याहूनही औत्सुक्याचं असेल ते म्हणजे मनसे नक्की कोणाला डॅमेज करणार? आणि हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात

After publicly supporting the BJP in the Lok Sabha, Raj Thackeray had given a message to his workers, “Start preparing for the Vidhan Sabha!” Accordingly, Raj Thackeray is in full form in this year’s Vidhan Sabha elections. Therefore, it will be interesting to see how many and which MNS MLAs will be elected, but it will be even more interesting. That is, who exactly will MNS damage BJP, MVA or Mahayuti? And let’s try to know this

लोकसभेला भाजपला जाहीर पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी ‘विधानसभेच्या तयारीला लागा!” असा संदेश त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला होता. त्यानुसार यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे फुल फॉर्म मध्ये उतरले आहेत. त्यामुळे आता मनसेचे किती व कोणते आमदार निवडून येणार हे पाहणं औत्सुक्याचे असेल पण त्याहूनही औत्सुक्याचं असेल ते म्हणजे मनसे नक्की कोणाला डॅमेज करणार? आणि हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात…

महाराष्ट्रभरातून मनसेने जवळपास १३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. सध्या या उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू असून राज ठाकरे देखील त्यांच्या उमेदवारांसाठी विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 137 उमेदवारांपैकी मनसेचे काही उमेदवार निवडून येतील मात्र मनसेचे बहुतांश उमेदवार हे त्यांच्या मतदार संघातील विजयी उमेदवारांच्या विजयाचं कारण ठरतील! ज्याचं कारण आहे ‘मत विभाजन!’ त्यामुळे मनसेचे रिंगणात उतरलेले हे उमेदवार नेमकी कोणाची मत खाणार? कोणाला डॅमेज पोहोचणार? आणि याचा फायदा महायुती व महाविकास आघाडी यांमधील कोणाला होणार तेच पाहुयात.

सर्वात पहिले बोलूयात महायुतीबद्दल राज ठाकरेंचं भाजपा प्रेम काही लपून नाही. मागील काही दिवसांपूर्वी एका मुलाखती दरम्यान जेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? असा प्रश्न जेव्हा राज ठाकरेंना विचारला गेला होता तेव्हा महाराष्ट्रात भाजपाची सत्ता येईल व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील. अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली होती त्यासोबतच लोकसभेला देखील राज ठाकरेंनी भाजपला जाहीर पाठिंबा दिला होता त्यामुळे राज ठाकरेंचे उमेदवार भाजपला जास्त डॅमेज करणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे मात्र जर प्रत्यक्षात स्थिती पाहिली तर मनसेने जवळपास 70 मतदार संघामध्ये भाजपा विरुद्ध उमेदवार दिले आहेत.

दरम्यान यावर बोलताना “राज ठाकरे भाजपचे मित्र आहेत व ज्या ज्या मतदारसंघांमध्ये भाजपाच्या विरुद्ध मनसेचे उमेदवार आहेत त्या त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं पण या मैत्रीपूर्ण लढती मधून सुद्धा भाजपाच्या उमेदवारांना मत विभाजनाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसेने भाजपच्या विरोधात दिलेल्या या उमेदवारांमुळे भाजपला कुठेतरी नुकसान होण्याची शक्यता आहे पण तिथेच दुसरीकडे मात्र मनसे मुंबईतील फक्त 25 जागा लढवत आहे त्यामुळे उर्वरित जागांवर मनसेने उमेदवार न देत कुठेतरी महायुतीला सपोर्ट केला आहे अशा चर्चा सुद्धा रंगत आहेत. त्यामुळे एकीकडे राज ठाकरे महायुतीला मदत करताना दिसतात तर दुसरीकडे भाजपा समोर स्वतःचा उमेदवार देऊन भाजपच्या विरोधात उभे आहेत.

आता राज ठाकरेंनी दिलेल्या या उमेदवारांचा महाविकास आघाडीला किती फटका बसणार या शक्यतेवर जर विचार केला तर महाविकास आघाडी मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अनेक मराठी मतांचे विभाजन मनसेच्या उमेदवारांमुळे होईल सोबतच सुरुवातीपासून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्या विरोधातील राज ठाकरे यांची भूमिका या सगळ्या गोष्टींचा थेट फटका महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसेल असा अंदाज अनेक राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.

एकूणच सर्व स्थिती पाहता राज ठाकरे महायुती व महाविकास आघाडी या दोघांनाही डॅमेज करणार असल्याचे चित्र पाहायला मिळते पण राज ठाकरे यांचं भाजप प्रेम व त्यांनी भाजपला दिलेला पाठिंबा या सर्व या सगळ्या गोष्टीवरून मनसेच्या उमेदवारांचा सर्वात जास्त फटका हा महाविकास आघाडीला बसेल व मनसे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सर्वात जास्त डॅमेज करू शकते असं चित्र सध्या तरी दिसून येत आहे. तर यावर तुमचे मत काय? तुमच्यामते मनसे यावेळी किती जागा जिंकणार? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा