ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त केळेवाडी येथे महिला प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन हर्षवर्धन मानकर यांनी केले. यावेळी क्षमता बळकटीकरण व महिला जनजागृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून विजया गायकवड, कांताताई खिलारे, पाटील मॅडम, आणि सूनिता खरात यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. तसेच महिला बचत गटाच्या सदस्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे भाग घेतला.
हर्षवर्धन मानकर यांनी यावेळी सांगितले की, महिला उत्साहाने बचत गट सुरू करतात. परंतु पुढे काय करायचे याचे व्यवस्थित मार्गदर्शन मिळाले नाही, तर त्यांना गती मिळत नाही. या उपक्रमामुळे महिलांना गृह उद्योग व स्वयंरोजगार करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांना दीवा फाउंडेशनच्या माध्यमातून योग्य ते सहकार्य करण्यात येईल.