Shinde सरकारच्या या चुका
Shinde सरकारच्या या चुका त्यांना Vidhansabha 2024 ला महागात पडू शकतात.
आयुष्यात चुका ह्या प्रत्येकाकडूनच होतात, पण राजकारणात झालेल्या चुकांचे फार मोठे परिणाम भोगावे तर लागतातच सोबत त्याची भली मोठी किंमत देखील चुकवावी लागते. अश्याच काही चुका शिंदे सरकारने देखील केल्या आहेत, ज्यांचे परिणाम आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मध्ये दिसू शकतात. म्हणूनच कोणत्या चुका शिंदे सरकारला बॅकफूट वर नेऊ शकतात तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
सर्वात पहिली चूक म्हणजे मराठा आरक्षण चा मुद्दा. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहे, आणि मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे हा विषय अधिक चर्चेत आहे. जरांगे-पाटील यांनी सरकारने मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य न केल्यास निवडणुकीत त्यांच्या विरोधात उमेदवार उभे करणार असा इशारा दिला होता. पण तरीही महायुती सरकारकडून या साठी कोणतेही विशेष प्रयत्न होताना दिसले नाहीत, ज्यामुळे महायुतीला मतांमध्ये नुकसान होऊ शकते, विशेषतः मराठवाड्यात, जिथे मराठा समाजाचा प्रभाव मोठा आहे.
दुसरी चूक म्हणजे राज्यात वाढणाऱ्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी कोणतीही ठोस पावले न उचलणे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात 47 हजार 381 महिलांवरील गुन्हे व २०७६२ मुलांविरुद्धचे गुन्हे दाखल झाले आहेत. तर महाराष्ट्रात दररोज 21 बलात्काराची प्रकारणे नोंदवली जातात. या सोबतच सरार्स होणार गोळीबार, पुणे पोर्शे कार प्रकरण, बाबा सिद्दीकी यांची हत्या, ड्रग्जची तस्करी, यांसारख्या अनेक गुन्ह्यांमुळे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेंचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पण तरीही शिंदे सरकारकडून गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीयेत.
तिसरी चूक म्हणजे महाराष्ट्रावर वाढवून ठेवलेला कर्जाचा भार. सद्य स्थितीला महाराष्ट्रावर ७ लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे, व अश्यातच लाडकी बहीण योजना, मोफत वीज, १ रुपयात पीक विमा, टोल माफी यासगळ्यामुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार असून याचा थेट परिणाम नागरिकांवर होत आहे व त्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे.
शिंदे सरकारची चौथी चूक म्हणजे महाराष्ट्रात वाढणार बेरोजगारीचं प्रमाण. महाराष्ट्रातील 62 लाख युवक अद्याप बेरोजगार आहेत, बेरोजगारी असतानाही राज्यातील 2 लाखांहून अधिक सरकारी पदे रिक्त आहेत. तर पेपर लीक झाल्याने PSI, तलाठी आणि शिक्षक भरती यांसारख्या परीक्षा सुरळीत पार पडल्या नाही. त्यामुळे विद्यार्थी नाराज असून विद्यार्थी आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. यासोबतच महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रातील अनेक उद्योग धंद्यांसोबत रोजगार देखील महाराष्ट्राच्या बाहेर गेले आहेत. ज्यामुळे नागरिकांच्या खासकरून तरुणाईच्या मनात मोठा असंतोष पहायला मिळतोय.
शिंदे सरकारची पाचवी आणि सर्वात मोठी चूक म्हणजे शेतकऱ्यांचे जैसे थे असणारे प्रश्न! मोफत वीज, १ रुपयात पीक विमा अश्या अनेक योजना महायुती सरकारने चालू केल्या, मात्र फार कमी शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. तर अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, सोयाबीन- कापूस यांसारख्या पिकांना नसणारा हमीभाव यांसारख्या अनेक समस्यांनी शेतकरी हवाल दिल झाला आहे. यातूनच भारतातील एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी 38% शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण महाराष्ट्रात आहे, जे देशात सर्वाधिक आहे. तर एनडीएच्या काळात 20,000 हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून शेतकऱ्यांसाठी चालू केलेल्या सरकारच्या अनेक योजनांपासून अजूनही कित्येक शेतकरी वंचित आहेत.
तर या पाच मोठ्या चुकांमुळे शिंदे सरकार बॅकफूट वर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला या मुद्यांचा फायदा करून घेणं सहज शक्य असल्याने शिंदे सरकारच्या या चुका त्यांना महागात पडणार असल्याचं चित्र आत्ता सध्यातरी दिसून येतंय. तर यावरची तुमची प्रतिक्रिया कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि …