Shivteerth वरची P.M. Modi याची सभा झाली Flop?। Mumbai । Mahayuti
हिट झालेल्या चित्रपटापेक्षा फ्लॉप झालेल्या चित्रपटाची जास्त चर्चा होते. सभेच्या बाबतीत देखील असंच काहीसं होतं. आणि अश्यातच सध्या एक सभा खूप चर्चेत असून ती सभा फ्लॉप झाली असं अनेकांचं म्हणणं देखील आहे. आणि ती सभा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची. मुंबईतील शिवतीर्थावर विधानसभेच्या प्रचारासाठीची अखेरची सभा घेत नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा संपला. आणि या सभेच्या चर्चा सुरू झाल्या. म्हणूनच ही सभा का चर्चेत आहे? खरंच हि सभा फ्लॉप झाली का? ते जाणून घेऊयात…
8 नोव्हेंबर पासून नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी विविध ठिकाणी सभा घ्यायला सुरुवात केली, लोकसभेला देखील नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात अनेक सभा घेतल्या होत्या. पण विधानसभेतील प्रचार सभांमध्ये व लोकसभेसाठी घेण्यात आलेल्या प्रसार सभांमध्ये जमीन आसमानाचा फरक दिसून आला. भटकती आत्मा, नकली संतान असं म्हणत लोकसभेच्या प्रचार सभांदरम्यान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. मात्र यावेळी मोदींनी पवार व ठाकरे यांच्यावर टीका करण्याचे टाळले. अगदी शेवटच्या सभेत देखील मोदींनी ठाकरे व पवारांवर कुठल्याही पद्धतीची वैयक्तिक टीका केली नाही. त्यामुळे मोदी ठाकरे व पवारांना घाबरले आहेत असं अनेक जण म्हणाले. परिणामी मोदींचा संपूर्ण दौरा चर्चेच्या केंद्रस्थानी होता. तर दौऱ्यानंतर चर्चेचा विषय ठरली ती मोदींची शिवतीर्थावरची सभा.
सभा तर अनेक ठिकाणी, अनेक मैदानांमध्ये होतात पण शिवतीर्थावर होणाऱ्या प्रत्येक सभेला एक वेगळेच महत्व प्राप्त होतं. शिवतीर्थावर होणाऱ्या प्रत्येक सभेवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेलं असतं. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा याच शिवतीर्थावर झाली. आठवड्या भरा पासूनच या सभेची जय्यत तयारी कार्यकर्त्यांकडून केली जात होती. सुमारे लाखभर लोक सभेला उपस्थित राहतील या अंदाजाने, त्याप्रमाणे बैठक व्यवस्था देखील करण्यात आली होती.
या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह महायुतीच्या मित्र पक्षाचे विविध नेते, पदाधिकारी कार्यकर्ते व निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले महायुतीचे उमेदवार उपस्थित होते. “हि फक्त प्रचार सभा नसून या सभे मार्फत मी तुम्हाला काही दिवसांनंतर होणाऱ्या महायुती सरकारच्या शपथविधीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला आलोय” असं मोदी यावेळी म्हणाले तसेच महाविकास आघाडीच्या अनेकांवर टीका देखील केली पण यामुळे ही सभा गाजली का? तर अजिबात नाही! ही सभा गाजली ती भलत्याच कारणामुळे.Read More