आजच्या बातम्या1राजकारण1

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde। Kolhapur sabha।कोणाची सभा गाजली? #mva

Spread the love

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde। Kolhapur sabha।कोणाची सभा गाजली? #mva

कोल्हापुरातूनच प्रचाराचा शुभारंभ करायचा ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासूनची प्रथा आणि हीच प्रथा चालू ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल कोल्हापूर मधून प्रचाराचा नारळ वाढवला.

उद्धव ठाकरे यांनी आदमापुरात सभा गाजवली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीची सभा पार पडली. आता सभा पार पडणे आणि सभा गाजणे यात जितका फरक आहे तितकाच फरक एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या सभेमध्ये दिसून आला. म्हणूनच या दोन्ही सभांमध्ये नेमकं काय झालं ते जाणून घेऊयात …

कोल्हापुरातूनच प्रचाराचा शुभारंभ करायचा ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासूनची प्रथा आणि हीच प्रथा चालू ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल कोल्हापूर मधून प्रचाराचा नारळ वाढवला. उद्धव ठाकरे यांनी आदमापुरात सभा गाजवली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीची सभा पार पडली. आता सभा पार पडणे आणि सभा गाजणे यात जितका फरक आहे तितकाच फरक एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या सभेमध्ये दिसून आला. म्हणूनच या दोन्ही सभांमध्ये नेमकं काय झालं ते जाणून घेऊयात….

महाविजयाचा संकल्प करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या दहा उमेदवारांच्या प्रचारासाठी नारळ वाढवून महायुतीकडून प्रचाराचा श्री गणेशा करण्यात आला. यावेळी जाहीरनाम्यातील दहा कलमी कार्यक्रम मतदारांसमोर सादर करत महायुतीने प्रचाराचे रणशिंग फुंकले तर दुसरीकडे करवीर निवासिनी अंबाबाई आणि आदमापुरात बाळूमामांचे दर्शन घेतल्यानंतर के. पी.पाटील यांच्या प्रचारा साठी उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली.

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला ज्या गर्दीचा अंदाज लावला गेला होता त्याच्या निम्मी गर्दी देखील जमा झाली नाही. याउलट सभेदरम्यान अनेक जण उठून बाहेर देखील जात होते. तर हजारो लोक येणार या अंदाजाने मैदानात सजवलेल्या खुर्च्या मात्र रिकाम्याच राहिल्या होत्या.
  • दहा उमेदवारांच्या प्रचारासाठी घेण्यात येणाऱ्या महायुतीच्या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी होईल असा अंदाज वर्तवला जात होता व त्यानुसार आयोजकांकडून हजारो नागरिक सभेला उपस्थित राहतील यादृष्टीने जय्य्त तयारी देखील करण्यात आली होती पण प्रत्यक्षात मात्र काहीतरी विरुद्धच होताना दिसलं.

तर दुसरीकडे सतेज उर्फ बंटी पाटील व शाहू महाराज छत्रपती यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या उद्धव ठाकरेंच्या सभेला मात्र नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी उद्धव ठाकरेंनी सतेज पाटलांचं नाव घेताच लोकांनी एकच जल्लोष करायला सुरुवात केली. सभेसाठी जमलेली प्रचंड गर्दी, नागरिकांकडून करण्यात आलेला जल्लोष, व उद्धव ठाकरे यांच तडकत फडकत भाषण यामुळे या सभेचे अनेक व्हिडिओज देखील सोशल मीडियावर वायरल होताना पाहायला मिळाले.

परंपरेप्रमाणे कोल्हापूरमध्ये प्रचाराचा शुभारंभ होत असल्याने दोन्ही नेते सभेत काय बोलणार याकडे अवघ्या कोल्हापूर सह राज्याचे लक्ष लागून राहिले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सभेदरम्यान पाच महत्त्वाच्या घोषणा केल्या. ज्यात महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र महिला पोलिसांची पोलीस दलात भरती करणार, जीवनावश्यक वस्तूंचे म्हणजेच डाळ, तांदूळ, साखर, तेल यांसारख्या वस्तूंचे भाव आमचे सरकार स्थिर ठेवेल, मुंबईत अदानी प्रकल्प रद्द करून धारावीकरांना उद्योगधंद्यांसह घरे देऊ, राज्यातील मुलांना मोफत शिक्षण दिले जाईल, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव दिला जाईल अशा महत्वाच्या घोषणा करून उद्धव ठाकरेंनी समोर जमलेल्या गर्दीच्या टाळ्या मिळवल्या. तर संध्याकाळी झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या सभेत त्यांनी जाहीरनाम्यातील 10 कलमी कार्यक्रम मतदारांसमोर सादर केला. यातील पोलीस दलात महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलिसांची भरती व जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणे यांसारख्या घोषणा एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सभेमध्ये केल्या. ज्या उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सकाळच्या सभेतच केल्या होत्या. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची कुठेतरी कॉपी करण्याचा प्रयत्न झाला अशा चर्चा जोर धरू लागल्या आहेत.

एकाच जिल्ह्यात, एकाच दिवशी प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या या सभांमध्ये तुलना केली जाणार हे निश्चित होते, ज्यात सुरवातीला महायुतीकडून या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही उपस्थित असल्याने महायुतीची सभा गाजेल अशी शक्यता होती, मात्र प्रत्यक्षात महायुतीच्या सभेकडे लोकांनी पाठ फिरवल्याचं चित्र पहायला मिळालं तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या सभेत जल्लोष करणारी गर्दी होती. त्यामुळे एकनाथ शिंदेंची सभा कुठेतरी फसली असं म्हणावं लागत.

सभांना झालेल्या गर्दीचा, घोषणांचा, आणि देण्यात आलेल्या आश्वासनांचा परिणाम आता येणाऱ्या काळातील निवडणुकांवर कसा होणार? कोल्हापूरात कोण येणार? हे २३ नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल. पण तूर्तास तुमच्यामते कोणी सभा गाजवली? तुम्हाला कोणाचे भाषण आवडले ते कंमेंट करून नक्की सांगा….