निवडणूक २०२४-1

Ajit Pawar मुख्यमंत्री होणार?

Spread the love

निवडणुकां नंतर अजित पवार किंग मेकर ठरतील असे वक्तव्य नवाब मलिक यांनी केले होते. नवाब मलिक यांनी त्यांच्या या वक्तव्यामधून अजित पवारांच्या घर वापसीचे संकेत दिलेत असा अनेकांनी अर्थ काढला. पण मालिकांनी कश्याच्या आधारावर हे वक्तव्य केलं? या वक्तव्यामधून अजित पवारांच्या घर वापसीचा कसा काय संकेत मिळतो? वक्तव्यावरून मलिकांना नेमकं काय सूचित करायचं? आणि बहुमतासाठी लागणाऱ्या १४८ च्यामॅजिक फिगर सोबत याचा कसा संबंध आहे? हेच जाणून घेऊयात

भाजपाचा नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध होता पण त्यांच्या विरोधात जाऊन अजित पवार यांनी मानखुर्द शिवाजीनगर या मतदारसंघातून नवाब मलिक यांना एबी फॉर्म दिला होता. ज्याची चर्चा राज्यभर झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना “अजित पवार हे विधानसभा निवडणुकांमध्ये किंगमेकर ठरतील” असं वक्तव्य केलं होतं पण त्यांनी हे वक्तव्य नेमकं कोणत्या कारणांमुळे केले? या वक्तव्यामधून मालिकांना नेमकं काय सुचवायचं आहे ? तेच जाणून घेऊयात.

विधानसभा निवडणुका 2024 मध्ये काय होणार याबाबत सध्या अनेक अंदाज लावले जात आहे.

ज्यातील काही सर्व्हे समोर आले असून या सर्व्हेजमधील अंदाजानुसार निवडणुकांनंतर महाराष्ट्रात भाजपा सर्वात मोठा पक्ष असेल पण मागील निवडणुकीमध्ये शंभरी पार गेलेली भाजपाची गाडी यावेळी 85 ते 90 जागाच मिळूवू शकेल, तर भाजपा पाठोपाठ काँग्रेस 70 ते ८० जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट साधारणतः प्रत्येकी ३० ते ४० या दरम्यान जागा मिळवू शकतात. तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना ३० जागा मिळवेल व राष्ट्रवादी अजित पवार गट 25 ते 35 जागा जिंकण्यात यशस्वी होईल असे अनेक अंदाज लावले जात आहेत.

या अंदाजानुसार जर आपण गेलो तर महाविकास आघाडी जवळपास 125 ते 130 जागा मिळवताना दिसते तर अजित पवारां शिवायची महायुती अर्थात भाजपा व शिवसेना शिंदे गट देखील 120 ते 125 पर्यंतच पोहचते.अशा स्थितीत बहुमताचा आकडा गाठायला महाविकास आघाडी व अजित पवारां शिवायची महायुती या दोघांनाही जवळपास 25 ते 30 जागांची गरज असेल आणि अशा वेळेस अजित पवार यांच्याकडे असलेल्या 25 ते 3५ जागा या सरकार स्थापनेमध्ये महत्त्वपूर्ण ठरतील. आणि अजित पवार यांची बार्गेनिंग पॉवर देखील वाढेल.

या अंदाजानुसार जर आपण गेलो तर महाविकास आघाडी जवळपास 125 ते 130 जागा मिळवताना दिसते तर अजित पवारां शिवायची महायुती अर्थात भाजपा व शिवसेना शिंदे गट देखील 120 ते 125 पर्यंतच पोहचते.अशा स्थितीत बहुमताचा आकडा गाठायला महाविकास आघाडी व अजित पवारां शिवायची महायुती या दोघांनाही जवळपास 25 ते 30 जागांची गरज असेल आणि अशा वेळेस अजित पवार यांच्याकडे असलेल्या 25 ते 3५ जागा या सरकार स्थापनेमध्ये महत्त्वपूर्ण ठरतील. आणि अजित पवार यांची बार्गेनिंग पॉवर देखील वाढेल.

१४८ चा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी व सरकार स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही इच्छुक असतील. अशा वेळेस कोणाचं सरकार येणार? कोण सत्तेत बसणार?

आणि कोण विरोधी बाकावर हे अजित पवार कोणासोबत जाणार याच्यावरून ठरेल. अशा वेळेस अजित पवार महायुती व महाविकास आघाडी या दोघांकडे त्यांच्या आमदारांसाठी मोठी मंत्री पदे व स्वतःसाठी मुख्यमंत्री पदाची देखील मागणी करू शकतात व सरकार स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडी किंवा महायुती यामधील जे अजित पवारांच्या या मागण्या मान्य करतील त्यांचं सरकार स्थापन होईल. ज्याचे मुख्यमंत्री अजित पवार असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या सर्व अंदाजानवरून निवडणुकीत अजित पवार किंगमेकर ठरणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत.

निवडणुकांनंतर महायुतीतील मित्रपक्ष राहून महायुतीचे सरकार स्थापन करायचे किंवा पुन्हा एकदा घर वापसी करत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करायचे. यासारखे दोन्ही ऑप्शन्स अजित पवारांकडे खुले असतील व यातील कुठला ऑप्शन निवडायचा आणि कोणासोबत सत्ता स्थापन करायची हे अजित पवार ठरवतील. ज्यात पुढील भविष्याचा विचार करत अजित पवार महाविकास आघाडी सोबत देखील जाऊ शकतात. म्हणूनच अजित पवारांच्या घर वापसीच्या चर्चा रंगल्या आहेत.

आता या जर तर च्या गोष्टींच्या आधारेच नवाब मलीक यांनी निवडणुकांनंतर अजित पवार हे किंगमेकर ठरतील असं वक्तव्य केल्याचा अंदाज अनेक राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. तर यावर तुमची प्रतिक्रिया काय ते कंमेंट करून नक्की सांगा.