हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन, आणि सध्या महाराष्ट्रात निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे अशातच अनेक जण बाळासाहेबांचे विचार कसे होते, हे सांगत त्यांनी जी काही भूमिका घेतली आहे त्या भूमिकेवरून ते कसे त्या विचारांचे पालन करतात हे सांगत असतात पण यावरून बाळासाहेबांचा खरा राजकीय वारसदार नक्की कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर काही केल्या मिळत नाही. म्हणूनच बाळासाहेबांचा खरा राजकीय वारसदार कोण आहे? कोण खरंच त्यांच्या विचारांवर चालतोय? तेच जाणून घेऊयात
Today is the memorial day of late Balasaheb Thackeray, the emperor of the Hindu heart, and as the elections are going on in Maharashtra, many people are saying how Balasaheb’s thoughts were, and how they follow those thoughts based on the position he took, but who is the real political heir of Balasaheb? is There is no answer to this question. Therefore, who is the real political heir of Balasaheb? Who is really acting on their thoughts? Let’s learn that from today’s
पण तत्पूर्वी ह्या राजकीय वारसदारांच्या शर्यतीत आहेत ते पाहुयात. 2019 पूर्वी बाळासाहेबांचा राजकीय वारसदार कोण असा प्रश्न विचारला तर राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे असे समोर दोन पर्याय असायचे मात्र 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड करत ते बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहेत असं म्हणत त्यांनी शिवसेनेत बंड केले त्यामुळे बाळासाहेबांचा खरा राजकीय वारसदार कोण? हे ठरवण्यासाठी आपण राज ठाकरे उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांपैकी यांपैकी कोणी बाळासाहेबांनी अवलंबलेल्या त्रिसूत्री साठी काय केलं आहे? त्या मुद्द्यांवर त्यांची कशी भूमिका राहिली आहे? ते पाहुयात.
आता सर्वात पहिल बोलायचं झालं मराठी अस्मितेबद्दल तर, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांच्या कार्यकाळात मराठी भाषा सर्व शाळांमध्ये शिकवणे व शिकणे सक्तीचे केले. व त्यांच्या या निर्णयाचं अनेकांनी कौतुकही केले. राज ठाकरे यांच्या बद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्रातील दुकानांवर मराठीत पाट्या हव्या यासाठी मनसेने राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने केली आणि आज याच आंदोलनाच्या परिणामस्वरूप महाराष्ट्र मधील प्रत्येक दुकानाच्या पाटीवर मराठी भाषेत नाव असणे अनिवार्य झाले. त्यासोबतच कॉलर ट्यून मध्ये पहिली मराठी भाषा ऐकू येत नव्हती, पण राज ठाकरे यांनी यासाठी आवाज उठवला आणि कॉलर ट्यून मध्ये मराठी भाषा ऐकू यायला लागली. व याच आंदोलनाच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी मराठी अस्मिता जपली. आता बोलायचं झालं एकनाथ शिंदे यांच्या बद्दल तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे पण यासाठी फक्त एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केले का? तर नाही, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेक वर्षांपासून अनेक नेत्यांनी, अनेक साहित्यिकांनी व अनेक मराठी भाषा प्रेमींनी मागणी केली होती.
आता पुढचा मुद्दा आहे हिंदुत्वाचा! उद्धव ठाकरे हे सुरुवातीपासूनच कट्टर हिंदुत्ववादी राहिले होते. मात्र २०२२ नंतर “हृदयात राम आणि हाताला काम” या उक्तीवर आधारित उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व पाहायला मिळालं. 2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीची स्थापना झाली त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व कुठेतरी मवाळ होताना दिसलं. जिथे आता बोलायचं झालं राज ठाकरे यांच्या हिंदुत्वा बद्दल तर राज ठाकरे यांनी जेव्हा मनसेची स्थापना केली तेव्हा मनसे फक्त हिंदुत्ववादी विचारांवर केंद्रित नव्हती. मनसेने सर्वसमावेशक राजकारणावर भर दिला होता आणि मनसेच्या जुन्या झेंड्यातून याचा दाखला देखील मिळतो. मात्र 2020 मध्ये राज ठाकरेंनी शिवरायांची शिवमुद्रा असलेल्या मनसेच्या नव्या भगवा रंगाच्या झेंड्याचे अनावरण केले आणि ते पुन्हा एकदा हिंदुत्ववादी विचारांवर आले त्यानंतर त्यांनी मस्जिद वरील भोंग्यांवर सातत्याने आवाज उठवला, त्यासोबतच लाव रे तो व्हिडिओ म्हणत माहीम मधील अनधिकृत मजारीवर आक्षेप नोंदवला परिणामी ती मजार तेथून हटवली गेली आणि या प्रकारे राज ठाकरे यांनी त्यांचे हिंदुत्व जपलं. तर एकनाथ शिंदे यांच्या हिंदुत्वाबद्दल बोलायचे झालं तर “आम्ही आमच्या हिंदुत्वा सोबत कुठलीही प्रकारची तडजोड करणार नाही, आम्हाला तडजोडीच हिंदुत्व नकोय असं म्हणत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत असलेली आघाडी तोडत आणि शिवसेने
आता शेवटचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र हिताचा. बाळासाहेबांसाठी महाराष्ट्र हित हे अतिशय महत्त्वाचे होते. त्यामुळे या तिघांनी महाराष्ट्र हितासाठी नेमक काय काय केल आहे? ते पाहुयात. उद्धव ठाकरे यांच्या बद्दल बोलायचे झालं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रावर किंबहुना संपूर्ण जगावर कोरोनाच संकट आलं होतं यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी या महामारीच्या काळात अतिशय योग्य रीतीने महाराष्ट्राला सांभाळलं आणि त्यांच्या या कामामुळे अनेक माध्यमांनी देखील त्यांच्या कामाची दखल घेत त्यांचं कौतुक केलं होतं.
आता राज ठाकरे यांनी महाराष्ट्र हिताबद्दल काय केलं याबद्दल बोलायचं झालं तर राज ठाकरे यांच्या हातात आजपर्यंत कधी सत्ता आलीच नाहीये, त्यामुळे सत्तेत राहून महाराष्ट्र हितासाठी राज ठाकरेंना काम करता आलं नाही. मात्र सत्तेत नसताना देखील त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून व त्यांच्या भूमिकांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र हित जपण्याचा प्रयत्न केला. ज्याच उदाहरणच द्यायचं झालं तर राज ठाकरे यांनी वेळोवेळी भूमिपुत्रांच्या अर्थात महाराष्ट्रातील लोकांच्या रोजगारासाठी आवाज उठवला, महाराष्ट्रातल्या उद्योगधंद्यांमध्ये सर्वप्रथम इथल्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी राज ठाकरे नेहमी आग्रही असतात त्यासोबतच मुंबईमध्ये व महाराष्ट्राच्या इतर भागात बांगलादेशी लोकांच्या घुसखोरीचा मुद्दा देखील राज ठाकरे यांनीच उचलून धरला व याकडे सरकारच लक्ष्य खेचलं आणि या माध्यमातून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र हित जपलं. यासोबतच महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांनी बनवलेली ब्लु प्रिंट देखील चर्चेचा विषय आहे.
आता बोलायचं झालं एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र हितासाठी काय केलं तर महाविकास आघाडी सरकारने सर्व योजना बंद केल्या, त्यांच्याकडून विकास कामांसाठी कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध करून दिला जात नव्हता असा आरोप करत त्यांनी शिवसेनेत बंड करून भाजपासोबत महायुती केली आणि या त्यांच्या बंडातून त्यांनी हिंदुत्वासोबतच महाराष्ट्र हित जपण्याचा प्रयत्न केला असं सांगण्यात येत. त्यासोबतच दावोस मध्ये झालेल्या बैठकीदरम्यान महाराष्ट्रात चार लाख कोटींची गुंतवणूक होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं, मात्र आजपर्यंत त्याबद्दल कोणतीही हालचाल करण्यात आली नाहीये. याउलट महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे व हिंजवडीतील अनेक आयटी कंपन्या एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र सोडून बाहेर गेल्या आहेत.मध्ये फूटपाडात एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत सरकार स्थापन केलं ज्याचं मुख्य कारण होतं हिंदुत्ववादी विचार आणि या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी त्यांचे हिंदुत्व जपलं.
तर उद्धव ठाकरे राज ठाकरे व एकनाथ शिंदे या तिघांमध्ये कोणी बाळासाहेबांच्या त्री सूत्रीच योग्य रीतीने पालन केले, मराठी अस्मिता, हिंदुत्व व महाराष्ट्र हित यासाठी काम केले हे ठरवण्यासाठी या सगळ्या मुद्द्यांचा आधार घेत नक्की कोण बाळासाहेबांचा खरा राजकीय वारसदार आहे? हे तुम्हीच ठरवा आणि तुमच्या मते बाळासाहेबांचा खरा राजकीय वारसदार कोण ते आम्हाला कमेंट करून देखील नक्की सांगा.
शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्र कट्टाच्या संपूर्ण टीम कडून विनम्र अभिवादन! जय महाराष्ट्र!